Surprise Me!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजप आमने सामने

2021-09-13 4,019 Dailymotion

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतील फ प्रभागात होत असलेल्या बेकायदा बांधकाम प्रकरणी प्रभाग अधिकारी अमित पंडीत व डोंबिवलीचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या विरोधात एक दिवसापूरती निलंबनाची कारवाई करा अन्यथा महासभा तहकूब करा, अशी मागणी प्रभाग समितीचे भाजपा सभापती खुशबू चौधरी यांनी केली. या मागणीला महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दाद दिली नाही. त्याविरोधात भाजपा सदस्यांनी महासभेचे कामकाज रोखून धरण्यासाठी सभागृहात जय श्रीराम, मोदी, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या. यामुळे सभागृहात शिवसेना-भाजपामध्ये गोंधळ उडाला.

Buy Now on CodeCanyon